Ad will apear here
Next
विविध कार्यक्रमांनी रंगले संस्कृत स्नेहसंमेलन


रत्नागिरी :
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संस्कृत संस्थानातर्फे चालवल्या जाणाऱ्या अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्रातर्फे रविवारी (१७ फेब्रुवारी) संस्कृत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या या संमेलनात गीत, नृत्य, समूहगायन, कथाकथन, नाटुकले आदी कार्यक्रमांचे रंगतदार सादरीकरण झाले. विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या.

रेखा इनामदार यांचा सत्कार

कला शाखेच्या उपप्राचार्य तथा संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये म्हणाल्या, ‘संस्कृत शिक्षण घेण्यासोबत त्यातून सादरीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने हे संमेलन सर्वांना उपयुक्त ठरणार आहे.’

‘स्वप्नवासवदत्ता’ हे नाटक संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत सादर करू या, असे प्रमुख पाहुण्या इनामदार यांनी सुचवले होते. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी, संस्कृतप्रेमींनी एकत्र येऊन हे नाटक सादर करून बक्षीस मिळवले.



रेखा इनामदार म्हणाल्या, ‘यापूर्वी श्रीकांत वहाळकर यांनी रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक संघटना चालू ठेवली. सध्या संस्थेचे काम मी पाहत आहे. राज्यात अशी ही एकमेव संस्था आहे. शाळेत संस्कृत शिकवताना मुलांमध्ये प्रेरणा निर्माण करते. संस्कृत शिक्षणामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात.’

या वेळी सर्व कार्यक्रम संस्कृतमधूनच झाले. अनौपचारिक शिक्षण केंद्रात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कथ्थक नृत्य, समूहगीत, कथाकथन, स्वच्छ भारत या विषयांवर नाटुकली सादर केली. चित्रपटांमधील गीतांचा संस्कृत अनुवाद करूनही काही गीते सादर करण्यात आली. संस्कृत शिक्षणामुळे खूप फायदा होत असल्याचे मनोगत अनेकांनी व्यक्त केले. दहा वर्षांची ऊर्जा आपटे हिने संस्कृत गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले.

(‘संस्कृत भारती’चे अखिल भारतीय प्रचार प्रमुख शिरीष भेडसगावकर यांची विशेष मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZOGBX
Similar Posts
‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ रत्नागिरी : ‘संस्कृत ही ठराविक समाजाची भाषा नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून, अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या संस्कृत केंद्राद्वारे अनेक जण संस्कृत शिकत आहेत. लोकांना याचा फायदा होत आहे,’ असे प्रतिपादन या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले
रत्नागिरीत संस्कृत शिक्षण केंद्र सुरू रत्नागिरी : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थान व रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र सुरू होत आहे. नव्या वर्गाचे उद्घाटन १० ऑक्टोबरला होणार आहे.
‘भाषा व्याकरणातून नव्हे, अनौपचारिकपणेच शिकता येते’ रत्नागिरी : ‘भाषा व्याकरण शिकल्यामुळे येत नाही, तर ती अनौपचारिक मार्गानेच शिकता येते. संस्कृत ही सर्वव्यापी आणि ज्ञानपरंपरेची भाषा आहे,’ असे प्रतिपादन ‘संस्कृत भारती’चे शिरीष भेडसगावकर यांनी केले.
राष्ट्रीय संस्कृत संस्थानतर्फे नऊ ऑगस्टला रत्नागिरीत शिक्षण केंद्राचे उद्घाटन रत्नागिरी : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थान आणि रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात गेली चार वर्षे अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र सुरू आहे. यंदाच्या वर्गाचे उद्घाटन नऊ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होणार आहे. जिल्हा परिषदेचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language